सदर वेबसाईट अद्ययावत / अपडेट होत आहे !

01 Oct 2023 (01:00 am)
राजयोग ट्रर्फ

उपक्रम तपशील
युगंधर प्रिमियर लिग

युगंधर वाद्यपथक आयोजित, “युगंधर प्रिमियर लिग” म्हणजेच “YPL” हे पथकाच्या वतीने राजस्व टर्फ च्या प्रांगणात भव्य दिव्य अशा स्वरूपात क्रिकेट महोत्सवाचे आयोजन करण्यात आले.

पारंपारिक वाद्य संस्कृती बरोबरच क्रिडा क्षेत्र देखिल आपल्या संस्कृतीचा एक महत्त्वाचा भाग आहे. त्यात क्रिकेट म्हंटलं तर हा सर्वाधिक लोकप्रिय आणि खेळला जाणारा खेळ आहे. 

मैदानी खेळ ही एक शारीरिक व मानसिक कला आहे. खेळल्यामुळे शारीरिक विकास साधतो तसेच मानसिकताही प्रबळ बनते. याचप्रमाणे आपल्या व्यक्तिमत्त्वाच्या विकाससाठी खेळ तितकाच महत्वाचं आहे अस म्हणणं वावगं ठरणार नाही. 

याचाच विचार करून गणेशोत्सव संपताच वादकांच्या सहवासाच्या झालेल्या सवयी ला दुरावा न देता लगेचच पथकाच्या वतीने पथका अंतर्गत क्रिकेट मॅचेस चे आयोजन केले. 

विशेष म्हणजे पथकाच्या मुलांप्रमाणे मुलींनी सुद्धा तेवढ्याच उत्सुकतेने या लीग मध्ये मोठ्या संख्येने सहभागी होऊन खेळाचा मनमुराद आनंद घेतला.

काही क्षण नितांत आनंद देऊन जातात त्यापैकीच एक म्हणजे YPL मध्ये क्रिकेट खेळण्याचा क्षण.  यातून मन प्रसन्न होण्यासाठी देखील ऊर्जा मिळाली. 

याप्रमाणेच मैदानी खेळांमुळे शरीराबरोबरच मनही तंदुरुस्त होते. मैदानावरील खेळ सर्वांनी आवर्जून खेळावेत असं आवाहन आपल्या युगंधर वाद्यपथकामार्फत सर्वांना करण्यात आले.