मिरवणूक बुकिंग नियम व अटी

युगंधर लोगो

मिरवणूक बुकिंग करण्यापूर्वी कृपया खालील नियम व अटी काळजीपूर्वक वाचा

नियम व अटी

युगंधर वाद्यपथक मिरवणूक सेवा

मिरवणूक व स्थिर वादन हे ठरलेल्या वेळेतच पूर्ण होईल.

मिरवणूकीसाठी ठरवलेल्या मानधनापैकी ८० टक्के रक्कम मिरवणूक ठरवताना जमा करावी, तसेच उर्वरित २० टक्के रक्कम मिरवणूक सुरु होण्यापूर्वी जमा करावी.

पाऊस तसेच इतर नैसर्गिक आपत्ती मध्ये वादन होणार नाही. पावसामुळे वादन न झाल्यास पथक जबाबदार राहणार नाही, तसेच आयोजक मंडळाकडून ठरलेले मानधन घेतले जाईल.

कोणत्याही कारणास्तव मिरवणूक रद्द केल्यास ठरविताना दिलेले मानधन परत दिले जाणार नाही.

वादना संदर्भात संबंधित मंडळाने पोलिस तसेच वाहतूक शाखेच्या परवान्याची नक्कल प्रत मिरवणूक होण्यापूर्वी पथक व्यवस्थापनाकडे जमा करावी.

पथकाच्या संपूर्ण वादकांच्या सुरक्षेची जबाबदारी आयोजकांची असेल.

वादनास गणेशोत्सवाच्या गर्दी मुळे किंवा इतर काही अडचणीमुळे वादनास उशिर झाल्यास आयोजक मंडळाने सहकार्य करावे.

मिरवणूक दरम्यान लागणारा ट्रान्सपोर्ट व जेवणाचा संपूर्ण खर्च आयोजकांकडे असेल. (ट्रान्सपोर्ट व जेवणाचा खर्च हा ठरविण्यात आलेल्या मानधना व्यतिरिक्त असेल.)

महत्वाची सूचना

वरील सर्व नियम व अटी मान्य करून मिरवणूक बुकिंग करावी. कोणत्याही प्रकारच्या तक्रारी टाळण्यासाठी नियम काळजीपूर्वक वाचा.