सदस्य नोंदणी नियम व अटी

युगंधर लोगो

युगंधर वाद्यपथकाचे सदस्य होण्यापूर्वी कृपया खालील नियम व अटी काळजीपूर्वक वाचा

सदस्यत्व नियम व अटी

युगंधर वाद्यपथक सदस्यत्व

सदस्य फॅार्म व फी रु. ५००/- भरणे आवश्यक आहे. (सदर नोंदणी शुल्क विना परतावा स्वरूपाचे असेल.)

संस्थेतर्फे चालविण्यात येणारं वाद्यपथक हा उपक्रम हौशी तत्वावर असून त्यातील सहभागी व्यक्तींना कुठल्याही प्रकारचे मानधन मिळणार नाही.

संस्थेचा सर्व हिशोच सदस्यांसमोर वर्षातून एकदाच मांडण्यात येईल.

सदस्याने संस्थेच्या अथवा पथकाच्या कोणत्याही व्यक्तीबरोबर गैरवर्तणुक अथवा संस्थेच्या प्रतिष्ठेला हानी पोहोचेल असे कृत्य केल्यास त्याचे सदस्यत्व तत्काळ रद्द करण्यात येईल.

संस्थेचे सदस्यत्व देणे अथवा रद्द करणे हा निर्णय कार्यकारणीचा असेल.

सदस्याने पथकाचा प्रवेश अर्ज जाणिवपूर्वक भरावा, जर कुठल्याही कारणास्तव प्रवेश अर्ज सदस्याने रद्द केल्यास कुठल्याही प्रकारची सदस्य फी परत केली जाणार नाही.

संस्थेच्या कोणत्याही नियमात बदल करण्याचा अधिकार हा कार्यकारणीने राखून ठेवलेला आहे.

पथक वादन तसेच सराव वेळे व्यतिरीक्त सदस्यांची जबाबदारी सर्वस्वी त्यांच्या पालकांची असेल. यासाठी पथक कुठल्याही प्रकारे जबाबदार राहणार नाही.

वरील सर्व नियम व अटी मान्य करूनच पथकात प्रवेश दिला जाईल.

सदस्यत्व फी

सदस्यत्व फी रु. ५००/- एकवेळ भरावी. ही रक्कम विना परतावा स्वरूपाची आहे. पेमेंट UPI: 9404227911@ybl

महत्वाची सूचना

वरील सर्व नियम व अटी मान्य करून सदस्यत्व घ्यावे. सदस्यत्वाच्या सर्व अधिकार व कर्तव्ये समजून घेऊन नोंदणी करावी.