सदर वेबसाईट अद्ययावत / अपडेट होत आहे !

अनुभव सर्वोत्तम वादनाचा…अभिमान नगरकरांचा..!

अनुभव सर्वोत्तम वादनाचा…
अभिमान नगरकरांचा...

“युगंधर वाद्यपथक”

युगंधर वाद्यपथक दि. ६ सप्टेंबर २०२३ रोजी म्हणजेच श्रीकृष्ण जन्माष्टमी च्या पवित्र दिवसाने सुरु झालेलं अद्भुत वाद्यपथक. आपल्या अवघ्या अ.नगर शहराचं भुषन असणारे ग्रामदैवत श्री विशाल गणपतीच्या साक्षीने व शुभाशीर्वादाने आम्ही एका नव्या रुपात , नव्या स्वरुपात “युगंधर” हे नाव घेऊन संपुर्ण निष्ठेणे भक्ती-भावाने ,नगरकरांच्या मना-मनात वादनाची ऊर्जा रुजवण्यासाठी उत्कृष्ठ वादकांच्या ताफ्यासह खास नगरकरांसाठी सज्ज झालो.

एका युगाचं महान नेत्तृत्व करणारे जगद्गुरु प्रभु श्रीकृष्ण यांच्या जन्माष्टमीच्या शुभमुहूर्तावर अवतरलेले युगंधर वाद्यपथक… युगंधर म्हणजे नक्की काय? तर स्वतः बरोबर सत्व जपणारे सक्षम नेत्तृत्व करणारे महान व्यक्तित्व….आणि यांच अनुषंघाने आपले ‘अस्तित्व ,कतृत्व व नेतृत्व’ सक्षमपणे सिद्ध करण्यास “युगंधर वाद्यपथक” दिमाख्यात उभे राहिले आणि बाप्पाच्या निरंतर सेवेला सुरुवात झाली…

‘युगंधर वाद्यपथक’ आजच्या या आधुनिक युगात आपली पारंपारिक संस्कृती,आपली लोककला , आपल्या लयबद्ध वादन कलेतुन सादर करणारं अतुलनीय वाद्यपथक आहे. आपल्या ह्या ऐतिहासिक नगरकरांच्या दिप्यमान आणि वैभवशाली पारंपारिक वादनकलेच्या परंपरेचा अनमोल ठेवा भावी तरुण पिढीमध्ये रुजु करण्यासाठी पुढाकार घेतलेले निस्वार्थी पथक..!