सदर वेबसाईट अद्ययावत / अपडेट होत आहे !
  • ...
  • ...
  • ...
  • ...

22 Jan 2024 (05:00 pm)
गाम्रदैवत श्री विशाल गणपती मंदिर, माळीवाडा,अ.नगर

उपक्रम तपशील
श्रीराम मंदिर प्रतिस्थापना सोहळा

ऐतिहासिक श्रीराम मंदिर व प्रभू श्रीराम मूर्ती प्रतिष्ठापना सोहळा निमित्त युगंधर वाद्यपथकाचा ग्रामदैवत विशाल गणपती येथे दिपोत्सव...

संपूर्ण देशाचं लक्ष वेधलेलं ऐतिहासिक श्रीराम मंदिर व प्रभू श्रीराम मूर्ती प्रतिष्ठापना सोहळा श्रीराम जन्मभूमी असलेल्या अयोध्या येथे संपन्न झाला.
संपूर्ण देशात श्रद्धामय वातावरण तयार झाले या पार्श्वभूमीवर या उत्कट अशा भक्तिमय सुवर्ण क्षणांचे साक्षीदार होण्यासाठी युगंधर वाद्य पथकाने अहमदनगर शहराचे आपले लाडके ग्रामदैवत विशाल गणपती येथे भव्य दिपोत्सव साजरा केला.

भगवान श्रीरामांना आपण मर्यादापुरुषोत्तम मानतो आणि यातच त्यांचे श्रेष्ठत्व व्यक्त होते.
ज्यांनी नीतिमत्ता, धर्म, शास्त्र, व्यवहार यात  स्वतः आखून घेतलेली चौकट कधीच ओलांडली नाही असे भगवान श्रीराम. 

भारतासारख्या खंडप्राय देशांत ऐक्य घडवणं हे तसे कठीण पण पिढ्यानपिढ्या ज्याला जसा श्रीराम भावला, तसा त्याने तो व्यक्त केला आणि त्यामुळे हा मर्यादापुरुषोत्तम देशाला बांधून ठेवणारी एक शक्ती ठरली. 

प्रभू श्रीराम हे भगवान विष्णूंचे सातवे अवतार आहेत श्री विष्णूंचे आठवे अवतार म्हणजे जगद्गुरु श्रीकृष्ण. 

श्रीकृष्ण म्हणजेच युगंधर यामुळेच युगंधर वाद्यपथकाने प्रभू श्रीराम यांना मानवंदना म्हणून हा दीपोत्सव साजरा केला.

युगंधर वाद्यपदकाच्या  दैदिप्यमान यशामध्ये व जडणघडणीमध्ये साक्षीदार असणाऱ्या ग्रामदैवत विशाल गणपती यांच्या समोर प्रभू श्रीराम मूर्ती प्रतिष्ठापणेचा आनंद मंगलमय व पवित्र वातावरणात युगंधर वाद्यपदकाच्या वादकांनी आगळावेगळा दीपोत्सव साजरा करून व्यक्त केला.