उपक्रम तपशील

चिरंतर भारतमातेची निरंतर सेवा

15 Aug 2024
06:00 pm
प्रोफेसर चौक, सावेडी, अहिल्यानगर.

१५ ॲागस्ट १९४७ म्हणजेच आपला स्वातंत्र्य दिवस. 
भारतीय इतिहासातील हा एक महत्वाचा दिवस, पण हे स्वातंत्र्य भारताला सहजासहजी मिळाले नाही, त्यासाठी अनेक स्वातंत्र सेनानींना आपल्या प्राणाची आहुती द्यावी लागली. 
अशा स्वातंत्र्य दिनाला आज ७८ वर्ष पूर्ण होत आहेत. याचेच औचित्य साधून झाडे जगली तरच शहराचे आरोग्य, पर्यावरण संतुलित राहणार आहे. खरे तर झाडे लावणे आणि ती जगवणे हे आपण राष्ट्रीय कर्तव्यच मानले पाहिजे. त्यादृष्टीनेच “युगंधर वाद्यपथक” द्वारे वृक्षांबद्दल सद्भभावना रूजू करण्यासाठी वृक्षरोपन उपक्रम राबवला जाणार आहे.

याबरोबरच आपल्या देशाच्या स्वातंत्र्यासाठी बलिदान दिलेल्या सर्व देशभक्तांना तसेच सर्व सामान्य नागरिकांसाठी अहोरात्र २४ तास तत्परतेने सेवा करणाऱ्या संपुर्ण पोलिस दल, लष्कर दल, हवाई दल इ. यांची प्रेरणा घेऊन आपल्या राष्ट्रीय ध्वजाला मानवंदना देऊन देश हा फक्त सीमेवर असलेल्या जवानांवर निर्धारित न होता आपल्या सारख्या असंख्य लोकांच्या क्षमतेवर आणि त्यांच्या कर्तृत्वावरही निर्धारित केला गेला पाहिजे ह्या निर्मळ हेतूने “चिरंतर भारतमातेची निरंतर सेवा” हि संकल्पना राबवून 
“युगंधर वाद्यपथक” समाजामध्ये देशसेवेचे प्रबोधन करून विशाल स्वरूपात वादन करणार आहे.
तरी समस्त नगरकरांनी या अद्भूत सोहळ्यामध्य आवर्जून हजर राहावे..!

स्थळ - प्रोफेसर चौक, सावेडी, अहिल्यानगर.
वेळ - संध्या ६ वाजता.

द्रुत माहिती

दिनांक: 15/08/2024
वेळ: 06:00 pm
स्थळ: प्रोफेसर चौक, सावेडी, अहिल्यानगर.
प्रतिमा: 0

शेअर करा