सदर वेबसाईट अद्ययावत / अपडेट होत आहे !
  • ...

28 Oct 2023 (10:00 am)
संजोग लॅान, नगर-मनमाड रोड, अ.नगर

उपक्रम तपशील
सन्हेसम्मेलन २०२३

आमचं स्नेहसंमेलन म्हणजे अवर्णनीय, अविस्मरणीय वादकांच्या आठवणींचा अनमोल ठेवा...

”युगंधर वाद्यपथक” मार्फत सर्व वादकांच्या गोड आठवणींना उजाळा देण्यासाठी 

”वादकोत्सव - २०२३”
”उत्सव नात्यांचा, वादकांच्या सन्मानाचा”..!

हा स्नेहमेळाव्याचा कार्यक्रम संजोग लॅान्स, सावेडी, अ.नगर येथे आयोजित करण्यात आला.

पथकातील सर्व वादकांसाठी स्नेहसंमेलन उत्साहात साजरा करण्याची ही नाविन्यपूर्ण संकल्पना राबविणारं नगरमधील एकमेव पथक…

होय एकमेव पथक..!

पथकातील सर्व भव्यदिव्य वादक मंडळी स्नेहसंमेलन संपन्न झाल्यानंतर शेवटी 
हे फक्त आमच्या वैभवशाली परंपरा असणाऱ्या युगंधर वाद्यपथकाचं वैशिष्ट्यच नव्हे तर इतरांसाठी खास आकर्षणाचा विषय बनत चालला आहे . 

ते म्हणतात ना, ‘आनंदाला वयाच बंधन नसतं’ अगदी त्या प्रमाणेच पथकातील लहानग्यांपासून जेष्ठांपर्यंत स्टेजवर आपली कला डान्स, सिंगिंग, फॅशन शो, रॅम्प वॅाक, संगीत खुर्ची अशा विविध मनोरंजक कलागुणांनी सादर करतात, तर कोणी मनोरंजनातून आपलं हे युगंधर वाद्यपथक एवढ्या खडतर प्रवासातून कस यशस्वीरित्या उभा राहिलं याचं काळजाला भिडणारं थोडक्यात सादरीकरणांच मनस्वी समाधान वाटतं. 
काय? आणि किती कौतुक करावे या सर्व वादक कलाकारांचे ? 
खरं तर हाच मोठा प्रश्न पडलेला असतो. 

मग कार्यक्रमाच्या सरते शेवटी पुन्हा समस्त वादकांच्या वोटींग प्रमाणे उत्कृष्ठ सादरीकरणाची निवड करून पथकातीलच सर्व सहकाऱ्यांच्या शुभहस्ते बक्षिसांच्या कौतुकाची पाठीवर थाप दिली जाते.
हे “युगंधर वाद्यपथकाच” सगळं काही अलौकिक आहे...

सरावाचे दिड-दोन महिने संपुर्ण मेहनतीने कार्य करणाऱ्या पथकाच्या करत्या-धरत्यांना थोडासा विरंगुळा देऊन कलागुणांना वाव देण्यासाठी लाखो रुपयांचे व्यासपीठ उपलब्ध करून संपुर्ण पथकासाठी शाही भोजनाचे आयोजन करून सगळ्या वादकांप्रती आदरभाव व्यक्त करणारं  पथक आजच्या काळात सापडणे दुर्मिळच...

आयोजित केलेल्या स्नेहभोजनाचा आनंद घेताना संपुर्ण पथकाची समानता काय असते हे नकळतपणे कृतीतून व्यक्त होते.

प्रत्येक वादकाला पथकात अनुभवलेला अवर्णनीय, अविस्मरणीय आनंद देण्यासाठी “युगंधर प्रतिष्ठान” मोठ्या थाटात स्नेहसंमेलन आयोजित करतात.